ज्ञानदीप को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि.चे लौकिकात्मक कार्य आणि संस्थेला मिळालेले पुरस्कार

संस्थेला मिळालेले पुरस्कार

pavana bank

• मुंबई पूर्व उपनगरे सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई ह्यांच्यातर्फे संस्थेने १० कोटी रुपयांचे भागभांडवल साध्य केल्याच्या निमित्ताने २००२-०३ ह्या आर्थिक वर्षात संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
• मुंबई पूर्व उपनगरे सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई ह्यांच्यातर्फे संस्थेने १० कोटी रुपयांचे भागभांडवल साध्य केल्याच्या निमित्ताने २००३-०४ व २००४- २००५ ह्यां दोन्ही आर्थिक वर्षात संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
• मुंबई विभागीय कॉंग्रेस कमिटीतर्फे २०११ ला सर्वोत्तम सहकारी पतसंस्थेचा पुरस्कार मिळाला.
• मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे मार्च २०१२ ला संस्थेस आदर्श सहकारी पतसंस्थेचा पुरस्कार मिळाला.
• आय. ओ. सी.आय. तर्फे ऑगस्ट २०१२ ला संस्थेस सहकारी संस्थेच्या विकासामध्ये भरीव कामगिरी बद्दल इंडिअन अचिवर्स अवॉर्ड.
• कृषितुल्य कृषी विविध संस्थेतर्फे संस्थेला रु. १० कोटीचे उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल पुरस्कार २००३ साली संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुरस्कार मिळाला.
• बँको पुरस्कार २०१५ ने सन्मानित पतसंस्था
• डिसेंबर २००३ साली सहकारी संस्थांच्या परिषदेत सहभागी झाल्याबद्दल सहकार विभाग, महाराष्ट्र शासन व मुंबई पूर्व उपनगरे सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई ह्यांच्यातर्फे पुरस्कार मिळाला.
• २००५ व २००६ साली स्वच्छता अभियान सुरु केल्याबद्दल जिल्हा परिषद सातारातर्फे पुरस्कार मिळाला.
• अक्षय ब्लड बँक, साताराकडून गौरवचिन्ह.
• आंतर सहकारी संस्था क्रिकेट फेस्टिवलमध्ये शिस्तपालन संघाचा पुरस्कार न्यू सातारा समूहाकडून प्राप्त झाला.
• श्री. ह.भ.प पांडुरंग घुले महाराज ह्यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय पुरस्कार.

संस्थेचे लौकिकात्मक कार्य

• संस्थेने अनुउत्पादक मालमत्तेचे प्रमाण ० % वर टिकवून ठेवून वर्षानुवर्षं ऑडीट वर्ग 'अ' मिळविला आहे.
• 'मागताक्षणी पैसे परत' ह्या तत्वावर आधारित कार्यपद्धतीमुळे पैसे सुरक्षितरीत्या गुंतविला जातो.
• सहकार क्षेत्रामधील कायद्यांचे तंतोतंत पालन.
• ग्रामीण भागात जिथे बँकिंग व्यवस्था पूर्णपणे कार्यान्वित नाही अशा ठिकाणीसुद्धा संस्था कार्यरत आहे.
• उद्योगांना संस्थेचा सर्वतोपरी पाठींबा आहे. ज्यामुळे उद्योग वाढीस लागून त्या संस्थेची उन्नती आणि प्रगती साधली जाते. संस्थेसाठी हि अभिमानाची गोष्ट आहे जेव्हा होतकरू वडापाववाल्याचा उद्योग वाढीस लागून तो एक मोठया रेस्टॉरंटचा मालक बनतो.
• ८०च्या दशकातील सुरवातीच्या काळात बँकिंग सेवा समाजातील तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहचावी या करिता ज्ञानदीप पतसंस्थेने अल्पपतपुरवठा योजना राबवण्यासाठी 'बँकसेवा तुमच्या दारी' ह्या अनोख्या तत्वावर रोजच्या रोज सक्षम दैनंदिन ठेव प्रतिनिधीं मार्फत बँकिंग सेवा अतिशय सोप्यापद्धतीने पुरविली. ह्या सेवेचा लाभ प्रामुख्याने छोटे भाजीवाले व दुकानदार ह्यांना झाला. ह्यामुळे त्यांच्या दैनंदिन ठेवीचे रुपांतर बचतीमध्ये झाले.
• संस्थेचा सामुहिक विकासावर कायमच दृढ विश्वास आहे . अन्य सहकारी पतसंस्थांना मदत करून त्यांचा विकास करणे व आर्थिक अडचणीत असलेल्या संस्थाना मदत करणे हे संस्थेचे सामाजिक कार्य होय. एखादेवेळेस कोणती पतसंस्था जर का मदत देऊनसुद्धा वरती येऊ शकत नसेल तर संस्था ठेवीदारांच्या पैश्यांच्या सुरक्षिततेसाठी त्या संस्थेला आपल्यात विलीन करून घेते. आतापर्यंत संस्थेने ४ पतसंस्थांना आपल्यात विलीन करून घेतले आहे.