ज्ञानदीप को- ऑप.क्रेडिट सोसायटी संचालक मंडळ

संचालक मंडळ

pavana bank
श्री. विश्वनाथ गोविंदराव पवार - संस्थापक, संचालक ( बी.कॉम. )

संस्थेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष. सहकारी अर्थव्यवस्था, सहकारी चळवळ यांचा चांगला अभ्यास. विविध नागरी पतसंस्थांचे संस्थापक व मार्गदर्शक. सामान्य व्यक्ती ते सन्मान्य विचारवंत यांना ध्येय, उद्दिष्ट प्राप्तीस्तव एकत्र गुंफून कार्यरत ठेवण्याची उत्कृष्ट हातोटी. ज्ञानदीप परिवाराच्या नावास सामान्य नागरिक ते शासकीय स्तरांपर्यंत विशिष्ट दर्जा, लौकिक प्राप्त करून देण्यात अथक योगदान. विविध संकल्पनांचे शिल्पकार.
पतसंस्थांच्या वसुली व व्यवस्थापन नियंत्रण समितीचे शासकीय सदस्य. ''महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट डिपॉझिट गॅरेंटी कॉर्पोरेशन'' चे प्रमुख प्रवर्तक, 'विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. 'जीवन मांगल्य संस्थान (वृद्धाश्रम), खडवली' संस्थेचे विश्वस्त. 'न्यू इंडिया अॅशुरन्स' कंपनीमधून विकास अधिकारी ह्या पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत.

 

श्री. जिजाबा सीताराम पवार - अध्यक्ष ( बी.कॉम. )

संस्थेचे विद्यमान संचालक तसेच नागरी पतसंस्थांच्या कामकाजात सतत कार्यरत. उत्कृष्ट संघटक. 'मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था लि.', मुंबईचे अध्यक्ष. पतसंस्थेच्या वसुली व व्यवस्थापन नियंत्रण समितीचे शासकीय सदस्य. 'विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष. 'महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन' चे संचालक- सदस्य, प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव. टाटा कॅन्सर रीसर्च इन्स्टिटयूट मधून सेवानिवृत्त.



 

श्री. चंद्रकांत शिवाजी ढमाळ - उपाध्यक्ष ( बी.कॉम, एम.बी.ए. )

विद्यमान सचिव. सन १९९१ ते १९९३ या कालावधीत संस्थेच्या सचिवपदाची जवाबदारी पार पाडली. व्यवस्थापन विषयाचे पदव्युत्तर पदवीधर (एम. बी. ए.) असल्याने त्यांच्या ज्ञानाचा- अनुभवाचा संस्थेच्या मनुष्यबळ नियोजन विकास, विपणन, वेतनविषयक करारासाठी बहुमोल उपयोग होतो. संस्थेला व्यावसायिक दृष्टीकोन देण्याबाबत महत्वाचे योगदान. लेखन व वाचनाचा व्यासंग चांगला आहे. क्रीडा विषयाची विशेषतः क्रिकेटची अतिशय आवड आहे. रौप्य महोत्सव समितीचे सदस्य या नात्याने आंतरपतपेढी क्रिकेटस्पर्धा शहरी व ग्रामीण स्तरावर आयोजीत करण्यामध्ये त्यांचे योगदान मोठे होते. 'महानंदा डेअरी' मधील पणन विभागातून ते सेवानिवृत्त झाले आहेत.

 

श्री. चंद्रकांत सर्जेराव शिंदे - सचिव ( बी.कॉम, एल.एस.जी.डी. )

विद्यमान संचालक. त्यांनी सन १९९६ ते १९९९ या कालावधीत अध्यक्ष म्हणून व १९९१ ते १९९३ या कालावधीत खजिनदार म्हणून पदभार सांभाळला. सहकारी क्षेत्रात कार्यकर्ते म्हणून सतत कार्यरत असतात. आर्थिक पृथ:करणात्मक दृष्टी असल्याने विविध प्रकरणी त्यांचे योगदान महत्वाचे ठरते. ते बृहन्मुंबई महानगर पालिकेतून सेवानिवृत्त झाले आहेत.


 


श्री. बाळकृष्ण तान्याबा पवार- संचालक (बी.कॉम, जी.डी.सी अँण्ड ए.)

संस्थेचे विद्यमान संचालक. १९९६ ते १९९९ या कालावधीत खजिनदार म्हणून त्यांनी संस्थेचा कार्यभार सांभाळला. १९८२ ते १९८३ या कालावधीत संस्थेत कर्मचारी म्हणून सेवा. संस्थेच्या प्राथमिक काळात संस्थेचे नियम, कर्मचारी रचना, कामकाज, जवाबदारी, नियामवली, वेतनविषयक करार या बाबत बहुमोल असे योगदान. थकीत कर्ज वसुलीविषयक प्रश्नांनबाबत चांगला अभ्यास व अनुषंगिक मार्गदर्शन. संस्थेच्या जडणघडणीतील जुने संचालक. 'महाराष्ट्र राज्य वाहतुक महामंडळात' सेवेत आहेत. ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे विश्वस्त.


 

श्री. एकनाथ यशवंत जगताप - संचालक ( बी.कॉम. )

संस्थचे विद्यमान उपाध्यक्ष व रौप्य महोत्सव समितीचे उपाध्यक्ष. १९९९ ते २००१ या कालावधीत संस्थेचे सचिवपद व १९९४ ते १९९६ या कालावधीत खजिनदार पद भुषविले. लेखा तपासणीच्या कामी तसेच नवीन संकल्पना कार्यान्वित करण्यामध्ये त्यांच्या ज्ञानाचा सातत्याने उपयोग होतो. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. संकल्पना, नियोजन व आयोजन हे त्यांच्या कामकाजाचे वैशिष्टय. स्वयंस्फूर्तीने संस्थेच्या शाखा तपासणी व थकित कर्ज वसुलीविषयक कामकाजात सहभाग. ते बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कर निर्धारण व कर संकलन विभागातून सेवानिवृत्त.

 

श्री. रविंद्र यशवंत केंजळे -संचालक (बी.एस्सी.)

संस्थेचे विद्यमान संचालक. सन १९९६ ते १९९९ या कालावधीत सचिवपदाची धुरा सांभाळली. शास्त्रशाखेचे पदवीधर असल्याने त्यांची पृथ:करणीय वृत्ती विविध विषयांची छाननी करण्यासाठी उपयुक्त ठरते. नाट्य, संगीत, वक्तृत्व व उर्दू शायरीची आवड. संस्थेच्या आर्थिक कामकाजाबरोबरच कलाविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात, सभा संयोजन करण्यात स्वयंस्फूर्त असतात. रौप्यमहोत्सवी समितीचे सदस्य या नात्याने संस्थेच्या कर्मचारी दैनिक ठेव प्रतिनिधीच्या अधिवेशनात लोकनाट्याचा वग सादर करण्यात पुढाकार. वारकरी संप्रदायी असल्याने त्या माध्यमातून प्रवचन व पारायणे इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे संघटन करीत असतात. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये प्रयोगशाळा विभागात अधिकारी म्हणून सेवेत आहेत.

 

श्री. विजय श्रीपती कासुर्डे - संचालक
विद्यमान संचालक. सन १९९९ ते २००१ या कालावधीत संस्थेच्या खजिनदार पदाचे मानकरी. सामाजिक बांधिलकीच्या व्रतातून संस्था चालवीत असलेल्या वधू - वर सूचक मंडळाची संपूर्ण जवाबदारी सातत्याने १२ वर्ष सांभाळीत आहेत. या माध्यमातून त्यांनी सुमारे २५०० हून अधिक विवाहांचे आयोजन केले आहे. शेकडो विवाहोत्सुक युवक/ युवती, नवविवाहित दांम्पत्य यांना विवाह व कौटुंबिक जीवनासाठी बहुमोल असे मार्गदर्शन केले आहे. प. पू . नारायण महाराज यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने संयोजित केलेल्या सामुदायिक बिगर हुंडा विवाह उपक्रम आयोजित करण्यात मोठे योगदान. वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट या नामांकित विश्वस्त संस्थेमार्फत पंढरीच्या वारकर्यांना वारीत वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून विनामुल्य वैद्यकीय सेवा. तसेच मुंबई व महाराष्ट्रात बऱ्याच खेडोपाडी दुर्लक्षित आदिवासी विभाग्तून प्रत्येक वर्षी अनेक वैद्यकीय चिकित्सा शिबीर घेत असतात. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना वैद्यकीय सल्ला व आर्थिक मदत प्राप्तीच्या दृष्टीने साह्य. तसेच देहू येथे गाथा मंदिर शिल्प उभारणीत भरीव कामगिरी. बँक ऑफ बरोडामध्ये सुपरवायझर (पर्यवेक्षक) म्हणून सेवानिवृत्त . बँकिंग व्यवसायातील जाण असल्याने संस्थेच्या कार्यालयीन कामकाजात बहुमोल मार्गदर्शन प्राप्त होते.


 

श्री. बाबासाहेब सोपानराव वांजळे - संचालक (बी.कॉम.)

विद्यमान संचालक पुणे शहर व परिसरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी ऋणानुबंध. ज्ञानदीप परिवाराचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश कार्यक्रमात सहभागी होत असतात. भारत संचार निगम लि येथे अधिकारी म्हणून सेवेत आहेत.




 

श्री. अनुप विश्वनाथ पवार - संचालक (डी.एम.ई.)

संस्थेचे तरुण संचालक, विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी ऋणानुबंध. ज्ञानदीप परिवाराचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश कार्यक्रमात सहभागी होत असतात. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांच्या उन्नत्ती करीता सतत कार्यरत. तसेच युवा पिढीच्या मुलभुत गरजा समजून त्यावर मार्ग शोधून त्यांच्या उज्वल भविष्यकारीता प्रयत्नशील असतात.



 

श्री. शुभम जिजाबा पवार - संचालक ( बी.एस.सी.आय.टी.एम.बी.ए. )






 

श्री. किरण किसन तपकिरे - संचालक ( बी.एच.एम., एम.बी.ए. )






 

श्री. हनमंत सीताराम धिवार - संचालक (बी.ए.)

विद्यमान संचालक मुंबई शहरातील दादर परिसरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी ऋणानुबंध. ज्ञानदीप परिवाराचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश कार्यक्रमात सहभागी होत असतात. बृहन्मुंबई महानगर पालिकेत अधिकारी म्हणून सेवेत आहेत.



 

श्री. निवृत्ती शिदू मस्के - संचालक (बी.कॉम.)

विद्यमान संचालक मुंबई शहरातील विक्रोळी परिसरातील ज्येष्ठ नागरीकांचे प्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी ऋणानुबंध. ज्ञानदीप परिवाराचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश कार्यक्रमात सहभागी होत असतात. बृहन्मुंबई महानगर पालिके मधून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.



 

सौ. छाया रत्नकांत शिंदे - संचालिका

संस्थेच्या विद्यमान महिला संचालिका. यशस्वी गृहिणी बरोबर यशस्वी उद्योजक. वाई परिसरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, संघटनांच्या कार्यात सहभाग. महिलांविषयक चळवळीप्रती विशेष आस्था व सक्रिय सहभाग. विशेषतः ग्रामीण शेतमजूरी करणाऱ्या महिलांबद्दलची कणव. रौप्य महोत्सवानिमित्त विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याबाबत विशेष प्रयत्न. महिला संचालक या नात्याने कामकाजात योग्य योगदान. आपल्या विनयशील व सौजन्यशील वर्तनाने अतिशय अल्पकाळात कर्मचारी, संचालक, ठेवीदार व हितचिंतक यांचे प्रेम त्यांनी संपादन केले आहे.

 

सौ. दुर्गा ब्रम्हानंद वाघ - संचालिका (बी.कॉम.)

संस्थेच्या महिला संचालिका. त्यांचा संस्थेच्या उपभोक्ता ह्या ग्राहक सेवा उपक्रमात सहभाग आहे. त्या नवी मुंबईतील बचत गटात अत्यंत कार्यरत आहेत. खंडाळा तालुका डेव्हलपमेंट बोर्डावर विश्वस्त पदावर आहेत.



 

श्री. लक्षमण गोपाळराव चव्हाण - मुख्यव्यवस्थापक (बी.कॉम, जी.डी.सी. अँण्ड ए.)

प्रशासन, लेखा, लेखापरीक्षण आणि मार्केटिंग विभागात विशेष प्राविण्य.