व्हिडिओ कॉन्फरन्स

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

pavana bank

ग्राहकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स - ग्राहकांचा पैसा व वेळ ह्या दोन्हींची किंमत अमुल्य आहे. पतसंस्था ह्या नात्याने ग्राहकांचे पैसे व वेळ वाचवणे हि संस्थेची नैतिक जवाबदारी आहे. ग्राहकांच्या शंकांचे निरसन ताबडतोब होण्याकरिता ग्राहकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा सुरु करून ग्राहकांना अद्ययावत सोयी प्रदान करण्याचा पायंडा पाडला. ह्या सुविधेमुळे ग्राहकांना कोठूनही थेट मुंबईमधील मुख्य कार्यालय किंवा कोणत्याही शाखा कार्यालयातून आमच्या प्रतिनिधीसोबत चॅटवर तत्क्षणी पूर्व मंजूर कर्जाबाबत माहिती मिळवू शकतात.

कर्मचाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स – संस्थेच्या चोहीकडे विस्तारलेल्या शाखांसोबत क्षणाचाही विलंब न होता संपर्क करून सामान्य कर्मचारी व व्यवस्थापक ह्यांच्यातील माहितीचे आदान- प्रदान सुलभ, जलद व सोप्या पद्धतीने होण्याकरिता संस्थेने कर्मचाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा सुरु केली आहे. ह्या सुविधेमुळे कोणत्याही समस्येवर त्वरित संपर्क केल्याने त्यावर तोडगा काढला जातो. संस्थेचे कामकाज ह्यामुळे अतिशय सुरळीतपणे पार पडते व संस्थेची उत्पादकता वाढीस लागते.