ज्ञानदीप को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. बद्दल

ज्ञानदीप को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.

pavana bank

सामान्य माणसांचे आयुष्य सुसह्य करून त्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्याच्या हेतूने ३०० सभासद व रु. १३,००० भाग भांडवलावर श्री. विश्वनाथ गोविंदराव पवार यांनी २ सप्टेंबर १९७८ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या अंतर्गत ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ची स्थापना केली.

मुंबईतील 'L' वार्डातून सुरु झालेला संस्थेचा प्रवास गेली ४३ वर्षे अविरत चालू आहे व संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. संस्थेची ८ विभागीय कार्यालये ११० शाखांचा कारभार समर्थपणे सांभाळतात आणि त्या सर्वांचा कारभार मुंबई मधील प्रशासकीय कार्यालयातून नियंत्रित केला जातो.

संस्था ज्यांच्या बळावर सुरळीत कार्य करते ते आमचे ८५० कर्मचारी व १३०० दैनंदिन ठेव प्रतिनिधी, तीच संस्थेची अमुल्य ठेव आहे. संस्थेचे सभासद, संचालक, कर्मचारी आणि दैनंदिन ठेव प्रतिनिधींना नेहमीच नवनवीन प्रकारे अद्ययावत ट्रेनिंग दिले जाते ज्यामुळे संस्थेच्या सेवेचा दर्जा अधिकाधिक चांगला होतो.